एसटी-कार अपघातात १ ठार; १० जखमी

डोंबिवली येथून देवरूख येथे मार्लेश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची झायलो कार आणि साखरपा-ठाणे एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. हा अपघात कोसुंब मारुती देवळाजवळ आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास झाला.

रजनी रमेश करोगल (६३) असे मृत महिलेचे नाव आहे. सूरज कमसेल गुप्ता (२५), रमेश अण्णाजी करोगल (७५), गुरुराज रमेश करोगल (३६), धनश्री गुरुराज करोगल (३३), दिलीपकुमार वासुदेव बबलाजी (६३) अशी जखमींची नावे असून सर्वजण डोंबिवलीतील आहेत. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात एसटी बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ही बस देवरुख एसटी आगाराची होती. अपघाताबाबत माहिती मिळताच देवरुख आगाराचे प्रमुख मोहिते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *