अर्भकाला पळविल्याप्रकरणी महिलेला एक वर्षाचा कारावास

हरयाणाच्या पलवल भागात ‘सायको किलर’ची दहशत पसरली आहे. परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी काल रात्री अवघ्या दोन तासांमध्ये सहा जणांच्या एकाच पद्धतीने हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खळबळ माजली आहे. धक्कादायक म्हणजे या सर्व हत्या शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर परिसरात झाल्या आहेत.

एकाच व्यक्तीने या हत्या केल्या आहेत. मारेकऱ्याने लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार करून त्यांचे खून केले आहेत. हा ‘सायको किलर’ एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याआधारे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही चित्रणात मारेकऱ्याच्या हातात लोखंडी रॉड दिसत आहे. या हत्याकांडानंतर शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मृतांमध्ये एक महिला आणि तीन सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. महिलेची हत्या येथील रुग्णालयात करण्यात आली. तसेच रस्त्यालगत घरांमधील लोकांच्याही हत्या केल्या आहेत. पाच मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. सायको किलरच्या शोधासाठी शहरात नाकाबंदी केली आहे. सर्व हत्या मध्यरात्री २ ते ४ वाजताच्या दरम्यान झालेल्या आहेत. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *