वसईच्या महापौरपदी रूपेश जाधव

 

वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी रूपेश जाधव आणि उपमहापौरपदी प्रकाश रॉड्रिक्स यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुढील अडीच वर्षांसाठी महापौरपद खुल्या गटासाठी होते. मात्र तरुणांना संधी आणि सोशल इंजिनीअरिंगचा फॉम्र्युला राबवत रूपेश जाधव आणि प्रकाश रॉड्रिक्स यांची निवड करण्यात आली. त्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी अर्ज न भरल्याने बुधवारी या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वसई-विरार महापालिकेच्या सध्याच्या महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ २८ डिसेंबर रोजी संपत आहे. पुढीच अडीच वर्षांसाठी महापौर आणि उपमहापौरपद हे खुल्या वर्गासाठी होते. पालिकेत सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे १०९ सदस्य आहेत. त्यामुळे महापौर बहुजन विकास आघाडीचाच होणार होता. शनिवारी महापौरपदासाठी प्रभाग समिती सभापती रूपेश जाधव आणि नवघर-माणिकपूर येथील सभापती प्रकाश रॉड्रिक्स यांची उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेचे पाच आणि भाजपचा एक नगरसेवक आहे. मात्र त्यांनी अर्ज भरले नव्हते. बुधवारी दुपारी महापौर निवडीची प्रक्रिया पार पडली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहीर केले आणि या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *