आईला सुखी ठेवत नाही म्हणून पतीने दोन्ही पत्नींना जाळून मारले

आपल्या आईला सुखी ठेवत नाही म्हणून एका व्यक्तीने त्याच्या दोन पत्नींना पेटवून दिल्याची धक्कादायक घटना येथे घडली. यात त्या दोघींचाही जळून मृत्यू झाला. आरोपी दीपा राम याने काल त्याच्या दोन पत्नी दरियादेवी (वय २५) व माली देवी (वय २७) यांना दागिने खरेदीच्या बहाण्याने मोटारीत बसवून नेले. कौटुंबिक वादातून राम त्या दोघींवर नाराज होता. त्या दोघी त्याच्या आईला सुखी, समाधानी ठेवत नाहीत असे त्याला वाटत होते, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक जालोरे बिन्जा राम यांनी दिली. चालत्या गाडीत राम याने त्याच्या दोन पत्नींशी भांडण केले व त्यात गाडीचा तोल सुटला. त्यानंतर तो थांबला. दरम्यान, त्याच्या एका पत्नीने गाडीतून उतरून स्थानिक लोकांच्या मदतीसाठी आरडाओरडा केला, पण राम याने तिला पुन्हा गाडीत ढकलून गाडी सुरू केली. काही अंतर गेल्यानंतर तो गाडीतून खाली उतरला व त्या दोघी बसलेल्या असताना गाडीला बाहेरून कुलूप लावले. नंतर मोटारीला आग लावली. त्यात त्या दोघींचा जळून मृत्यू झाला. संबंधित राम नावाचा आरोपी हा गुजरातमध्ये मजुरी करतो व तो तीन मुलांचा बाप आहे. त्याने गुन्हय़ाची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *