अश्विनी बींद्रे बेपत्ता प्रकरण : अभय कुरुंदकर याची गाडी जप्त

पोलीस अधिकारी अश्विनी बींद्रे बेपत्ता प्रकरणी अटक असलेले अभय कुरुंदकर याची गाडी जप्त करण्यात आली आहे.

सांगली येथून ही लाल रंगाची MH 10 AN 5500 क्रमांकाची फॉक्सवेगन कार पोलिसांनी जप्त केली असून, ही कार केमिकल  अॅनालिसीससाठी पाठवणार आहेत.

दरम्यान कुरुंदकर आणि राजू पाटील यांना आज पुन्हा कोर्टात हजर करणार आहेत. या कारच्या माध्यमातून पोलिसांना काहीतरी सुगावा  लागेल असे पोलिसांनी पनवेल न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे आता याप्रकरणी काही नवीन पुरावे समोर येतात का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *