नाशकात मनसे नगरसेविकेचे निधन

नाशिक  येथील मनसेच्या नगरसेविका सौ. सुरेखा रमेश भोसले यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मनसेला धक्का बसला आहे.

सौ. सुरेखा रमेश भोसले या गेल्या काही दिवसांपासून ब्रेन ट्युमरच्या आजाराने त्रस्त होत्या. मध्यंतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेऊन विचारपूस केली होती.

सुरेखा रमेश भोसले या सलग दुसऱ्यावेळी नाशिकच्या रविवार कारंजा या भागातून नगरसेविका झाल्या होत्या. त्यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *