नवजात बाळाला मृत घोषित करणाऱ्या मॅक्स रूग्णालयाचा परवाना रद्द

नवी दिल्लीतील शालीमार बाग परिसरात असलेल्या मॅक्स रूग्णालयाचा परवाना अखेर रद्द करण्यात आला आहे. एक आठवड्यापूर्वी या रूग्णालयाने दोन नवजात जुळ्या बालकांना मृत घोषित केले. एवढेच नाही तर या दोन्ही मुलांचे मृतदेह पॉलिथीनच्या पिशवीत गुंडाळून सीलबंद केले आणि त्यांच्या पालकांना अंत्यसंस्कारासाठी सोपवले. या मुलांचे पालक आणि इतर नातेवाईक अंत्यसंस्कारांसाठी जात असताना पॉलिथीनच्या पिशवीत हालचाल जाणवली तेव्हा दोनपैकी एक मूल जिवंत असल्याचे समजले. या पालकांनी तातडीने पिशवी उघडली तेव्हा जुळ्या दोन मुलांपैकी एक मूल जिवंत होते. त्या मुलाला तातडीने दुसऱ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही दिवसांनी ते मूलही दगावले. या सगळ्या प्रकारात दिल्लीच्या मॅक्स रूग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी एक पत्रकार परिषद घेऊन रूग्णालयाचा परवानाच रद्द केल्याचे सांगितले. ‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *