१३ वर्षांपूर्वी पतीची हत्या करुन लपवला होता पतीचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक

पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने १३ वर्षांपूर्वी एका व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह सेप्टिक टाकीत लपवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.

पतीचीच केली हत्या 

आरोपी महिलेने पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह लपवून ठेवला होता. या प्रकरणाचा कुणालाही तपास लागला नव्हता. मात्र, अखेर हा प्रकार उघडकीस आला आहे.

देहविक्रीचे रॅकेट

बोईसरमध्ये ४ डिसेंबर रोजी पोलिसांनी फरीदा भारती नावाच्या महिलेच्या घरावर छापा मारला. बोईसरमधील गांधीपाडा परिसरात राहणाऱ्या या महिलेच्या घरात देहविक्रीचे रॅकेट चालवला जात असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आणि ४ तरुणींची सुटका केली.

आरोपी महिलेने गुन्हा केला कबूल 

पोलिसांनी छापेमारी दरम्यान केलेल्या तपासणीत पतीच्या हत्येचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला आहे.

४३ वर्षांच्या फरीदाने सांगितले की, १२ वर्षांपूर्वी तिने आपला पती सहदेव याची हत्या केली होती. सहदेव झोपलेला असताना फरीदाने त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सहदेव याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सेप्टिक टाकीतून मानवी सांगाडा जप्त केला असून आता अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *