‘त्या’ मुलीवर फेकले उकळते तेल, आरोपींची कबुली, दोघांना अटक

अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड नव्हे, तर उकळते तेल फेकल्याची कबुली अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी दिली. मंगळवारी घडलेली ही घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचे उघड झाले.
या प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी सुशील विलास मेश्राम (२०, रा. बोकुलखेडा, भातकुली) व भूषण हरिश्चंद्र उईके (१९,रा. सुकळी बनारसी) यांना मंगळवारी मध्यरात्रीनंतर अटक केली. शाळा सुटल्यानंतर पीडित मुलगी मैत्रिणीसोबत घरी जात असताना दुचाकीवर आलेले दोन तरुण थर्मासमधील उकळते द्रव्य तिच्या अंगावर फेकून पळून गेले. त्यामुळे ती १६ टक्के भाजली. तिला नागरिकांनी तत्काळ इर्विन रुग्णालयात दाखल केले. मुलीवर अ‍ॅसिडहल्ला झाल्याचे वृत्त शहरात पसरले होते, परंतु उकळते तेल फेकल्याचे स्पष्ट झाले.
एप्रिलमध्ये बेलपुºयातील एका लग्न समारंभात आरोपी सुशील मेश्राम व पीडित मुलीची ओळख झाली. सुशीलचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जडले. दोघेही मोबाइलवर एकमेकांशी संवाद साधत होते. पीडित मुलगी दुसºया तरुणांशी बोललेली सुशीलला आवडत नसे. या विषयावर त्यांच्यात वाद झाला. त्या मुलीने सुशीलच्या कानशिलात लगावली होती. नेमका तोच राग सुशीलच्या मनात होता. त्यामुळे त्याने हा प्रकार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *