बिबट्याने ७ वर्षाच्या मुलाला अंथरुणातून ओढून नेले

मालेगावात बिबट्यानं एका सात वर्षीय मुलावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला.

सातवा बळी

नरभक्षक बिबट्याचा हा सातवा बळी आहे.. मालेगावातील साकूर-देवघट शिवारात ही घडना घडली. कुणाल प्रकाश  अहिरे असं मृत मुलाचं नाव आहे.

घटनास्थळी डोकं आणि धड 

बुधवारी रात्री कुणाल आपल्या आईसोबत शेतावरील झोपडीत झोपला होता त्यावेळी बिबट्यानं कुणालला अंथरुणातून ओढून नेलं. घटनास्थळी कुणालचं डोकं आणि धड आढळून आल.

भीतीच वातावरण 

या घटनेमुळे परिसरात  भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांकडून तीव्र संताव व्यक्त होतोय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *