स्वतःच्या लग्नाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी जाणा-या युवकाचे अपघाती निधन झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात त्याचा मित्र जखमी झाला. आज सकाळी दहा वाजता डेगवे येथे हा अपघात झाला. किरण रविकांत सावंत असे मृत तरुणाचे नाव आहे. जखमी तरुणाचे नाव कळू शकले नाही.
बांदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयदीप कळेकर यांनी या अपघाताची माहिती दिली आहे. किरण याचे तीन दिवसानंतर लग्न होणार होतं. दोडामार्ग येथील आपल्या नातेवाईकांना पत्रिका देण्यासाठी दुचाकीवरुन तो चालला होता. डेगवे येथे समोरून येणा-या दुचाकीने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
