अभिनेत्री वाणी कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

‘बेफिक्रे’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेली वाणी कपूर आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कपूर कुटुंबियांवर गुन्हा

दिल्लीच्या मुखर्जीनगर पोलीस ठाण्यात तिचे वडील शिव कपूर आणि आई डिंपी कपूर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

कुटुंबावर फसवणुकीचा गुन्हा

पोलिसांनी कलम 420, 120 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाणी आणि तिच्या कुटुंबावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकच मालमत्ता अनेक वेळा विकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

महिलेनी केली तक्रार

रितु त्यागी नावाच्या महिलेने कपूर कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 2008 मधलं हे प्रकरण आहे. रितु यांनी शिव कपूरकडून 55 लाखाचं एक घर विकत घेतले. नंतर, बँकेने घराबाहेरच्या लिलावाची नोटीस लावली. तेव्हा असं कळालं की, या घरावर आधीच लोन घेण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *