दहशतवादी संघटनेच्या 45 अतिरेक्यांना चक्क खाताना जीव गमवावा लागला

 दहशतवादी संघटनेच्या 45 अतिरेक्यांना चक्क खाताना जीव गमवावा लागला

एखाद्याचा गळा कापण्याचा किंवा गोळी मारण्याचा व्हिडीओ बनवून जगाला क्रूरता दाखवणाऱ्या, आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या 45 अतिरेक्यांना चक्क खाताना जीव गमवावा लागला. रमझानदरम्यान रोजा सोडताना जेवणातून विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

इराकमधील मोसूल शहरात मंगळवारी रात्री अतिरेक्यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. आयएसआयएसचे 145 दहशतवादी मांडीला मांडी लावून बसले होते. अतिरेकी हसत खिदळत जेवणावर ताव मारत होते. त्याचवेळी कोणीतरी ओरडलं की, खाने में जहर है आणि एकच खळबळ उडाली.

इफ्तार पार्टीचा नूर अचानक बदलला. एरव्ही धर्माच्या नावाखाली निरपराधांची क्रूरपणे हत्या करणारे अतिरेकी एकामागोमाग कोसळत होते आणि इफ्तार संपताच 45 अतिरेकी मेले.

अतिरेक्यांच्या मृत्यूमागे विषबाधा आहे की विषप्रयोग देऊन याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, नोव्हेंबरमधील टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलं होतं की, सीरियाच्या लष्करातील काही सैनिकांना पकडलं होतं. त्यांना आयएसआयएसच्या कॅम्पमध्ये शेफ म्हणून घेण्यात आलं.

त्यामुळे त्यांनीच सगळ्या दहशतवाद्यांना विष देऊन कायमचं झोपवल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *