समृद्धी महामार्ग गैरव्यवहार : मोपलवारांना क्लीन चीट

समृद्धी महामार्ग गैरव्यवहार : मोपलवारांना क्लीन चीट

वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना अखेर क्लिन चीट मिळालीय.

समृद्धी महामार्गाचे प्रमुख असताना मोपलवार यांच्या फोनवरील आक्षेपार्ह संभाषणाची सीडी बाहेर आली होती. समृद्धी महामार्गाच्या जमीन व्यवहारांबाबत त्यात संभाषण होतं.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यावरून गदारोळ झाल्यानंतर मोपलवारांना पदावरून हटवण्यात आलं होतं. तसंच त्यांच्या चौकशीसाठी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती.

या समितीनं आपल्या अहवालात मोपलवारांना क्लिन चीट दिलीय. ही सीडी बनावट असल्याचा अहवाल फॉरेन्सिक लॅबनं दिला होता. त्यामुळं मोपलवारांना दिलासा मिळाला असून, त्यांना पुन्हा महत्त्वाच्या पदावर नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *