राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर?

राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता क्षीरसागर यांच्या घरी पोहचले आहेत. त्यामुळे या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन आणि पंकजा मुंडे याही आहेत. मुंबईहून मुख्यमंत्री, क्षीरसागर एकाच विमानाने औरंगाबादला आले. तिथून एकाच हेलिकॉप्टरने ते बीडला रवाना झाले. हेलिपॅडवर येताच क्षीरसागर यांच्या घराकडे सीएम फडणवीस यांचा ताफा रवाना झाला.

जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे मराठवाड्यातील मोठे मानले जातात. ते राष्ट्रवादीचे माजी मंत्री होते. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास हा राष्ट्रवादीसाठी मोठा दणका मानला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *