कॉंग्रेस प्रदेश कार्यालयाची मुंबईत तोडफोड, हल्लेखोर पसार

कॉंग्रेस प्रदेश कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. हा हल्ला कुणी केला याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाहीये.

मुंबईत आधीच मनसे आणि कॉंग्रेस फेरीवाला प्रकरणावरून आमनेसामने आले असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ही तोडफोड नेमकी कोणी केली याचा तपास पोलीस करत आहेत.

याआधी फेरीवाल्यांचा वादावरून कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाणही केली होती. त्यामुळे हा हल्ला कुणी केला याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *