व्यायामशाळा प्रशिक्षक म्हणून काम करणा-या महिलेने जिम मालकाविरुद्ध बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
पूजा (नावात बदल) ही महिला पुण्यातील एका जिममध्ये व्यायाम प्रशिक्षक म्हणून काम करते. मंगळवारी रात्री तिने विलेपार्ले पोलीस ठाण्यात जिम मालकाविरोधात तक्रार दाखल केली. विलेपार्ले पोलीस ठाण्यातील एका अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, २००१पासून पीडित महिला आणि हा मालक एकत्र राहतात. पुण्यात कोथरूडमध्ये असलेल्या व्यायामशाळेत त्यांची ओळख झाली. तेव्हापासून त्यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. या दोघांचे मुंबईत येणे-जाणे होते. विलेपार्लेच्या एका हॉटेलमध्ये ते दोघे एकत्र राहायचे. मात्र दोन महिन्यांपूर्वी पीडित महिलेच्या एका मित्रामुळे जिम मालकाशी तिचे बिनसले. त्यानंतर ते वेगळे राहू लागले. मात्र तो तिचा सतत पाठलाग करत असतो.
त्यानुसार अखेर तिने विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. महिलेच्या आरोपानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याबाबत चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी सांगितले.
