लातूर-नांदेड राज्य महामार्गावर क्रुझर व टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातामुळे सात जण ठार तर १३ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (मंगळवार) पहाटे चारच्या सुमारास कोळपापाटीजवळ घडली. अपघात इतका भीषण होता की, क्रुझरच्या समोरच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला. या मार्गावरील मागील १५ दिवसातील हा दुसरा भीषण अपघात आहे. मृत तसेच जखमींमध्ये लातूर, नांदेड, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांचा समावेश असल्याचे समजते.
कोळपापाटीजवळ बंद अवस्थेत उभ्या असलेल्या टेम्पोला ओव्हरटेक करताना क्रुझरचा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत व्यक्तींची नावे अशी, विजय तुकाराम पांडे (वय ३०, रा. नाशिक), तुकाराम ज्ञानोबा दळवे (वय ३५, लातूर), मनोज चंद्रकांत शिंदे (वय २५, लातूर), दत्तू बळीराम शिंदे (वय ३५, नांदेड), शुभम शरद शिंदे (वय २५, अहमदनगर), उमाकांत सोपान कारुले (वय ४५), मीना उमाकांत कारुले (वय ४०, लातूर).
