भोईवाडा कोर्टात भरदिवसा ३ जणांवर चॉपरने हल्ला

मुंबईतील भोईवाडा कोर्टात एक रक्तरंजित थरारनाट्य घडलंय.
दिवसा ढवळ्या फिर्यादीनं आरोपीवर चॉपरनं हल्ला केला आहे. फिर्यादीनं ३ जणांवर हा हल्ला केला आहे.

२००९ च्या एका प्रकरणात आरोपींची निर्दोष सुटका झाली. त्यानंतर संतापलेल्या फिर्यादीने भर कोर्टात हा हल्ला केला आहे.

या घटनेनंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हल्लेखोराला अटक केली आहे.

एकूण तीन जणांवर चॉपरने हल्ला केला असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपीने हा चॉपर दोन दिवसांपूर्वीच न्यायालयात नेल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *