विमानाला विलंब झाल्यानं महिलेचा सुटला बांध, मंत्र्याशी हुज्जत

व्हीव्हीआयपी प्रवाशामुळे विमानाला विलंब झाल्याची आणखी एक घटना समोर आलीय.

केंद्रीय मंत्री के.जे. अल्फोन्स यांच्याशी इम्फाळ विमानतळावर एका महिला प्रवाशानं घातलेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

डॉक्टर निराला यांना पाटण्याला जायचं असताना विमानाला उशीर झाल्यामुळे त्या संतप्त झाल्या होत्या. परंतु, अल्फोन्स यांच्या म्हणण्यानुसार ही महिला रडत असल्यामुळे आपण तिची चौकशी केली आणि तिचा संयम सुटला.

मात्र, आपल्यामुळे या विमानाला विलंब झाला नसल्याचा खुलासाही त्यांनी केलाय… तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मणिपूर दौऱ्यामुऴे किमान तीन उड्डाणांना विलंब झाल्याचं विमानतळ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *