टीसीला पाहून हार्ट अटॅकने प्रवाशाचा मृत्यू

अमरनाथ एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान टीसीला पाहून एका व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

टीसीला पाहून घाबरले

शिव कुमार वर्मा वय वर्ष ५२ हे शाहजहांपूर येथून नजीबाबादसाठी प्रवास करत असतांना ही घटना घडली. जनरल तिकीट घेऊन स्लीपर कोचमधून प्रवास करत होते. टीसीला त्या कोचमध्ये बघताच त्यांना हृद्यविकाराचा झटका आला.

तिकीट मागताच सीटवर कोसळले

शिवकुमार यांच्यासोबत त्यांचा साडू आणि साली देखील होते. जनरल तिकीट घेऊन ते स्लीपर कोचमध्ये चढले होते. टीसीने तिकीट मागताच ते सीटवर कोसळले. टीसीने कंट्रोल रुमला कळवले. 10:30 ला गाडी बरेली जंक्शन येथे पोहचली. मेडिकल टीम यांनी शिवकुमार वर्मा यांची तपासणी केली पण डॉक्टरांनी शिवकुमार यांना मृत घोषित केले.

दीपक वर्मा यांच्या कन्येचा विवाह 30 नोव्हेंबर रोजी झाला होता. त्यांना चार मुले आहेत. ते सोन्याचे व्यापारी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *