टँकरच्या धडकेत आईसह तीन मुले ठार, जळगावातील दुर्घटना

भरधाव टँकरने मागून चिरडल्याने पायी जात असलेली आई आणि तिची तीन मुले असे चौघे जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना आज (रविवार) सकाळी १०.३० वा. मुक्ताईनगरजवळ घडली. या घटनेत एक जण जखमीही झाला आहे. निम्मीबाई गोधन पवार (वय ३८) या मुलं अल्केश गोधन पवार (वय ८), अमरचंद पवार (वय १ वर्षे) आणि मुलगी उडदिया गोधन पवार (वय ६) अशी मृतांची नावे आहेत.

गोधन पवार यांचा रूद्राक्ष विक्रीचा व्यवसाय आहे. ते कुटुंबातील सात सदस्यांसह रूद्राक्ष विक्रीसाठी घोडसगाव येथून चिखलीकडे जात होते. त्याचवेळी मुक्ताईनगरहून मलकापूरकडे जात असलेल्या धरधाव टँकरने (एमएच ०६ एक्यू ९९७) पायी जाणाऱ्या पवार कुटुंबाला मागून जोराची धडक दिली. यात वरील चौघे जागीच ठार झाले तर निहाल गोधन पवार (वय १२) हा गंभीर जखमी झाला. गोधन व नेहाबाई हे दोघेजण अपघातातून बचावले. निहालवर रूग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *