कल्याणमध्ये गाऊन घालून मंदिरात गेलेल्या महिलेला मारहाण

गाऊन घालून मंदिरात गेल्याचा जाब विचारल्यानं दोन महिलांमध्ये वाद झाला आणि त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं.

कल्याण पूर्वेला हा प्रकार घडला. सोमवारी सायंकाळी तिसगाव भागातल्या तिसाई मंदिराच्या आवारात हा प्रकार घडला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या मंदिरात महिलांनी गाऊन घालून जाऊ नये असा नियम आहे. तरीही एक महिला गाऊनवर मंदिरात जाऊन आली.

 दरम्यान, गाऊन घालून आलेल्या महिलेला स्थानिक आशा गायकवाड यांनी जाब विचारला. त्यामुळे गाऊन घातलेली महिला संतापली आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादाच पर्यावसान भाडणात आणि पुढे हाणामारीत झाली. या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांनी परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मारहाणीतली महिला प्रतीक्षा लाकडे ही पोलीस अधिकारी असल्याने पोलिस तिला पाठीशी घालत असल्याचाही आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र याबद्दल कोणीच कॅमेरासमोर बोलण्यास तयार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *