कृष्णा नदीत बोट उलटून 16 जणांचा मृत्यू

बोट उलटून झालेल्या अपघातात 24 जणांना जलसमाधी मिळाली. ही घटना आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातल्या इब्राहिमपत्तनम मंडळजवळ कृष्णा नदीत घडली.

घटनास्थळी मदत आणि बाचव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 16 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती डीजीपी सांभा शिवा यांनी दिली आहे.  या बोटीत नेमके किती जण होते याबाबतची माहिती अजूनही मिळाली नसून रेस्क्यू टीम शोध मोहीम राबतेय, असेही संभा शिवा म्हणाले.

दरम्यान, बोटीत असलेल्यांची एकूण संख्या माहिती नसल्यामुळे अद्यापही काही मृतदेह पाण्यात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. कार्तिक महिना असल्याने पर्यटनासाठी हे सर्व जण या ठिकाणी आले होते. बोटीत असणारे सर्वजण कृष्णा आणि गोदावरीचा संगम पाहण्यासाठी एकाच बाजूला आल्याने ही दुर्घटना घडल्याचं नावाड्याने सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *