मुंबईत मुलांना उडवून टेम्पो चालक फरार

 मुंबईच्या मालवणी परिसरातल्या मार्वे रोडवरच्या मंदिराजवळच्या ‘टी जंक्शनजवळ एका टेम्पोनं शाळकरी मुलांना उडवलं.

या अपघातात एका मुलीचा मृत्यू झालाय, तर तीन मुलं जखमी आहेत.अपघातानंतर टेम्पोचा चालक पसार झालाय..

मुस्कान मेमन असं मृत मुलीचं नाव असून ती 13 वर्षाची होती. तेरा वर्षाची नेहा मेनाली,  नऊ वर्षचा भूपेंद्र मेनाली आणि 12 वर्षाची कमल मेनाली हे तिघे जखमी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *