ठाणेकरांनो वेळेत पाणीबिल भरा नाहीतर…

ठाणेकरांनो आता सावधान… वेळेत पाणीबिल भरा नाही तर तुमची नळजोडणी कापण्यात येणार आहे. जे पाणीबिल वेळेत भरणार नाहीत त्यांची खैर नाही.

एक डिसेंबरपासून व्यापक नळ संयोजन खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला पाणी हवं असेल तर वेळेत बिलंही भरा असा इशारा महापालिकेने दिलाय.

आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिका-यांची बैठक घेऊन विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला. त्यात पाणीवसुली कमी असल्याचं आढळल्याने आयुक्तांनी तातडीने कठोर प्रयत्न करण्याचे आदेश काढलेत. दरम्यान, पाणीबिलाबाबत काही वाद असेल तर आधी पाणीकर भरावी. त्यानंतर जादा घेतलेली रक्कम पुढील बिलात समायोजित केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *