गेल्या 10 दिवसांपासून मृत तरुणाला प्रार्थनेच्या माध्यमातून जिवंत करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आहे. अंबरनाथ येथील ही अंधश्रद्धेची धक्कादायक व तितकीच गंभीर स्वरुपातील घटना आहे. मशक ऑक्टोविवो असे मृत तरुणाचे नाव आहे. तो 17 वर्षांचा होता. मशकला जिवंत करण्यासाठी चर्चचे फादर आणि त्याच्या नातेवाईकांनी प्रार्थनेच्या माध्यमातून जिवंत करण्यात प्रयत्न केला. गेल्या 10 दिवसांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता.
मशकचा मुंबईतील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. यानंतर त्याचा मृतदेह अंबरनाथमधील एका चर्चमध्ये ठेऊन प्रार्थनेच्या माध्यमातून त्याला जिवंत करण्याचा प्रकार सुरू करण्यात आला. दरम्यान, याबाबतची माहिती अंबरनाथ पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी फादर आणि त्याच्या नातेवाईकांना समज दिली. रविवारी ( 5 नोव्हेंबर ) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास मशकचा मृतदेह चर्चबाहेर काढण्यात आला. दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत मशकच्या नातेवाईकांना विचारले असता त्यांनी बोलणं टाळलं आहे.
