बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रविवारी रात्री एका महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र, या बाळाच्या शरीराला दोन तोंड आहेत.
परळी तालुक्यातील रहिवासी असलेली ही गर्भवती महिला बाळंतपणासाठी अंबाजोगाईतील सरकारी रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्या पोटातील बाळ सर्वसाधारण नाही हे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. संजय बनसोडे यांच्या लक्षात आले. त्यांनी तिचे बाळंतपण केले. बाळाच्या जन्मानंतर बाळाला दोन तोंड असल्याचे लक्षात आले. सदरील बाळाचे वजन साडे तीन किलोहून अधिक आहे. बाळाची तब्येत सुखरूप असल्याचे त्यांच्यावर उपचार करीत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले.
अंबाजोगाईत दोन तोंडाच्या बाळाचा जन्म
