मॅगीवरील बंदीनंतर ‘हल्दीराम’च्या खाद्य पदार्थात विषाणू आढळल्याने अमेरिकेत या पदार्थावर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातही हल्दीरामच्या सर्व उत्पादनांची चौकशी करण्यातचे निर्देश राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी बुधवारी दिले. अन्न सुरक्षा कायद्यानुसार प्रत्येक वेळी नव्या डब्यात पदार्थ भरून त्यांची विक्री करणे बंधनकारक आहे.
मात्र राज्यात रिपॅकिंग म्हणजे जुन्याच डब्यांत पदार्थ भरून त्यांची विक्री होत असल्याची माहिती राज्यमंत्री ठाकूर यांना मिळाली होती.
जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार होत असल्याने या संदर्भातील चौकशीचे निर्देशही राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी दिले.
राज्यातही ‘हल्दीराम’च्या सर्व उत्पादनांची चौकशी करण्यात येणार असल्याने मॅगीपाठोपाठ आता ‘हल्दीराम’वरही बंदीची संक्रांत कोसळण्याची चिन्हे आहेत.

