६० वर्षाचे आजोबा होणार ३७ व्या बाळाचे बाप

सध्याच्या काळात लग्नानंतर जोडप्यामध्ये  फॅमिली प्लानिंगची हे महत्त्वाचे मानले जाते. बऱ्याचदा याचा विचार करुनही लग्न ठरतात. पण या सर्वाला छेद देणारी घटना समोर आली आहे.  पाकिस्तानमध्ये साठ वर्षांच्या एका आजोबांची  बाप होण्याची ही ३७ वी वेळ आहे. गुलजार खान असं त्यांच नाव आहे

एक किंवा जास्तीत जास्त दोन मुले असा विचार सर्वसाधारण जोडपी करीत असतात. पण गुलजार यांना आधीच पाच-दहा नव्हे तर तब्बल ३६ आपत्ये आहेत.

त्यांनी आतापर्यंत तीन लग्न केली आहेत. तीनही पत्नींपासून त्यांना ही ३६ मुलं आहेत. त्यांची एक पत्नी लवकरच बाळाला जन्म देणार आहे.

पत्नी, मुले, सूना व नातवंडे असे १५० जणांचं त्यांचे मोठे कुटुंब हा चर्चेचा विषय राहिला आहे. पम खान यांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.
आमचं कुटुंबच एवढं मोठं आहे कि आमच्या मुलांना खेळण्यासाठी बाहेरच्या कोणाचीही गरज नाही असं हे खान बंधू मोठ्या अभिमानाने सगळ्यांना सांगतात.
ही अल्लाची मर्जी असल्याचे खान यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे खान यांचा भाऊ मस्तान यानेही तीन लग्न केली असून त्याला २२ मुलं आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *