काश्मीरमध्ये मुस्लिमांनी केलं हिंदू ब्राम्हणावर अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये जातीय सलोख्याचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. अनंतनागमध्ये मुस्लीम बांधवांनी काश्मिरी पंडितांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

75 वर्षीय त्रिलोकनाथ शर्मा यांच्या घरी अनेक लोकं जमले. ज्यामध्ये बहुतेक मुस्लीम बांधवच होते. त्रिलोकनाथ शर्मा त्यांच्या मागे दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. तो व्यवसायाने शिक्षक होते.

तेथे उपस्थित काही लोकांनी यावर दु:ख व्यक्तं केलं. आम्ही शतकांपासून एकमेकांसोबत जगत आहोत. त्रिलोकनाथ यांचं कुटुंब 1990 मध्ये काश्मीरमधून गेले नव्हते. त्यांच्या अंत्यसंस्काराला स्थानिक आमदार, माजी मंत्र्यांसह अनेक लोकं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *