सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोटाच्या विकारामुळे सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सोनिया गांधी यांच्यावर रुग्णालयात डॉक्टरांच्या एका पथकाच्या देखरेखीखाली उपतार सुरु करण्यात आले आहेत. सोनिया गांधी यांच्या प्रकृती संदर्भात अद्याप डॉक्टरांनी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

गेल्यावर्षीही वाराणसीमध्ये एका रोड-शो दरम्यान सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर ३ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांचं एक ऑपरेशन करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *