नाशिकमध्ये दिवसाढवळ्या भाजप नगरसेविकेला लुटलं

नाशिकमध्ये सोनसाखळी वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांच्या तावडीतून नगरसेविकाही सुटलेली नाहीये.

लक्ष्मीपूजनच्या दिवशी सत्ताधारी भाजप नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्यातील एक तोळ्याचं सोन्याचे पेंडल चोरट्याने लंपास केलंय.

लक्ष्मी पूजनासाठी झाडू आणि पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी भालेराव घराबाहेर पडल्या होत्या. तेव्हा त्यांच्यावर पाळत ठेवत चोरट्याने भालेराव यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. नगरसेविकेने आरडाओरडा करत प्रतिकार केला असता चोरट्याने तिथून पळ काढला.

चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतलंय. मात्र, त्यांच्या दत्तक शहरात भाजपच्याच नगरसेविका सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्य महिला कशा सुरक्षित राहतील असा सवाल उपस्थित होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *