महागड्या सायकल चोरुन ओलएक्सवर विकणाऱ्या उच्चशिक्षित चोराला अटक

मुंबईच्या पवई आय आय टी कॅम्पस मध्ये महागडया सायकल चोरून त्या ओएलएक्स वर विकणाऱ्या एका उच्चशिक्षित चोराला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हरिशचंद्र गाडेकर असे या तरुणाचे नाव असून तो मॅकेनिकल इंजिनियर असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

व्हीजेटीआय मधून त्याने इंजिनियरिंग मध्ये टॉप केल्याचे हि त्याचे म्हणणे आहे.हा तरुण आयआयटी मध्ये काही प्रशिक्षण घेण्यासाठी येत असे. या ठिकाणी केम्पस मध्ये शिक्षण घेत असलेली मुले कँम्पस मध्ये फिरण्यासाठी महागड्या सायकल वापरत असत.

या सायकल ची किंमत अंदाजे दहा ते पंधरा हजार पर्यंत आहे. या सायकल चोरून हा तरुण ऑनलाईन विकत असे. फी भरण्यास पैसे नसल्याने सायकल विकत असल्याचे तो ग्राहकांना सांगत असे.

पवई पोलिसांना गुप्त बातमीदाराने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याने विकलेल्या सात महागड्या सायकल पोलिसांनी मुंबई तसेच बाजूच्या परिसरातून ताब्यात घेतल्या आहेत. सध्या त्याला २५ तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *