बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरुन पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दत्तवाडी परिसरात घडली आहे.
सकाळी १०च्या दरम्यान पु. ल. देशपांडे उद्यानासमोरील पाटे डेव्हलपर्सच्या साईटवर हा प्रकार झाला. सातव्या मजल्याचे काम सुरू होते. त्याचवेळी स्लॅब कोसळला. या ठिकाणी एकूण ४ कामगार काम करीत होते. ते खाली कोसळले. यातील तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. प्रकाश साव (वय २६), दुलारी पासवान (वय २८) व मिथुन सिंग (वय २२, सर्व रा. झारखंड) अशी मृतांची नावे आहेत. तर रामु पासवान (वय २४) जखमी आहे.
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील पुढील तपास करीत आहेत.
