राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 148 वी जयंती आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे. शिवाय ‘गांधींचे थोर विचार कोट्यवधी जनतेला प्रेरणा देणार आहेत’, असेही ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे
गांधींच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील राजघाटावर सर्वपक्षीय नेते हजेरी लावत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक नेत्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आणि काही वेळ ध्यानस्थ बसून त्यांच्या स्मृतींना वंदन केलं.
