राणे दसऱ्याला आपला निर्णय घेतील – चंद्रकांत पाटील

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि नारायण राणे यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. शाह यांनी राणेंना दोन्ही बाजू समजावून सांगितल्यात. त्यामुळे पुढचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार राणेंचा असून ते दस-याला आपला निर्णय घेतील  असं विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरात बोलत होते. तसंच सत्तेत राहून आंदोलन करणा-या शिवसेनेवरही चंद्रकांत पाटील यांनी टीकास्त्र सोडलं आहे. अशा आंदोलनांमुळे शिवसेनेचंच हसू होत असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *