इक्युबेटरने पेट घेतल्याने भाजलेल्या नवजात बालकाचा मृत्यू

इक्युबेटरने पेट घेतल्याने भाजलेल्यानवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या बाळाची आई स्वाती कदम यांना प्रसूती वेदना होऊ लागल्याने सोमवारी रात्री हाँस्पिटल मध्ये भरती करण्यात आलं होतं.

मंगळवारी त्यांची प्रसुती झाली. मात्र बाळाला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र तासाभरातच इनक्युबेटरने पेट घेतला. ज्यामध्ये बाळ गंभीर रित्या भाजल्याने बाळाला उपचारासाठी दुसरीकडे हलविण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान या बाळाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *