सचिन तेंडुलकरने वीरूला दिली बीएमडब्लूची भेट

क्रिकेटमधून दूर झाले असले तरीही वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या जोडगोळीचे ऑफ फिल्ड संबंध अजूनही दृढ आहेत.

नुकतीच सचिनने सेहवागला बीएमडब्ल्यू ७३० एलडी ही कार भेट दिली. सेहवागने या गिफ्टसाठी आभार मानताना ट्विटरची मदत घेतली आहे. सचिनने गिफ्ट केलेल्या कारची किंमत सुमारे १.१४ कोटी आहे.

भारतीय संघाची दमदार ओपनिंग सचिन आणि  सेहवाग या जोडीने अनेकदा झाली आहे. सचिन तेंडुलकर अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. पण सचिनचे त्याचे कौतुक करताना ‘काळही या माणसासाठी थांबेल’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

नव्या दम्याच्या खेळाडूंचा भारतीय संघांमध्ये समावेश झाल्यानंतर सेहवागला त्याच्या खेळामध्ये सातत्य टिकवून ठेवणं कठीण झाले. परिणामी त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *