मुलांना घराबाहेर काढून दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

राहत्या घरात पती-पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील चाकण येथील ही घटना आहे. महादेव गोरोबा शिंदे (वय 45 वर्ष) आणि लक्ष्मी शिंदे (वय 35 वर्ष ) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे.
सोमवारी (25 सप्टेंबर) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चाकणमधील शिवगंगा हाउसिंग सोसायटी येथे हे दाम्पत्य राहत होतं. धक्कादायक बाब म्हणजे या दाम्पत्यानं आपल्या मुलांना घराबाहेर काढून स्वयंपाक घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

घराचा दरवाजा उघडला जात नसल्याने शेजा-यांना संशय आला व त्यांना घराचा दरवाजा तोडला, त्यावेळी शिंदे दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समजलं. दरम्यान, शिंदे दाम्पत्यानं आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *