बँका सलग तीन दिवस बंद राहणार

चालू आठवड्यात चौथा शनिवार, रविवार आणि सोमवारी गांधी जयंती असल्यानं  बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत.  त्यामुळे येत्या शुक्रवारच्या आतच बँकांची कामं उरकावी लागणार आहेत.

जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी बँकाही पावलं उचलताना दिसणार आहेत. एटीएममधून पुरेशी रोकड राहील याची खबरदारी घेण्यात येणार आहे.

या वर्षात अनेक वेळा सलग बँका बंद राहतील अशा सुट्या येत आहेत. यामुळे बँकेशी संबंधित कामं होण्यास विलंब होतो, मात्र ऑनलाईन व्यवहाराच्या जगात ही अडचण एवढी येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *