जगप्रवासाला निघालेल्या नौदलाच्या महिलांना दिसला व्हेल मासा

नाविका सागर परिक्रमा उपक्रमा अंतर्गत नौदलाच्या महिला अधिकारी तारिणीवर स्वार होऊन जगभ्रमंतीवर गेल्यात. प्रवास करत तारिणी ही नौका हिंद महासागरात पोहचलीय. याच प्रवासा दरम्यान या सगळ्या महिलांना व्हेल माशाचं दर्शन घडलंय.

तारिणी नौकेसमोर हा व्हेल मासा पाहायला मिळाला. ही सगळी दृष्यं कॅमे-यात कैद झाली आहेत. आयएनएसव्ही तारिणी ही आयएनएसव्ही म्हादईची पुढील आवृत्ती आहे. या नौकेने नौदलाच्या महिला अधिकारी जगप्रवासाला रवाना झाल्यात. भारतात महिला कर्मचा-यांसह हा प्रवास पहिल्यांदाच होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *