निर्मला सीतारामन यांचा लोणचं करतानाचा व्हिडिओ व्हायरल

देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा लोणचं तयार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर देशाचे संरक्षणमंत्रिपद मिळालेल्या सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत.

मात्र सितारामण यांचा असाच साधेपणा दाखविणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,  त्याला नेटिझन्सची मोठी पसंती मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये देशाच्या एका महत्त्वाच्या खात्याच्या मंत्री असलेल्या सीतारामन कैरीचे लोणचं तयार करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ निर्मला सीतारामन यांचे पती परकाल प्रभाकर यांनी २०१३ मध्ये यू-ट्यूबवर अपलोड केला होता. त्यावेळी प्रभाकर आंध्रप्रदेश सरकारमध्ये संपर्कविषयक सल्लागार म्हणून कार्यरत होते. सीतारामन या २००६ मध्ये भारतीय जनता पक्षाशी जोडल्या गेल्या. त्यानंतर त्यांनी पक्षातील प्रवक्तेपद भूषविलं आणि आता थेट संरक्षणमंत्रीपद त्यांना देण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *