अँजेला मर्केल यांची सलग चौथ्यांदा जर्मनीच्या चँसेलरपदी निवड

अँजेला मर्केल यांची सलग चौथ्यांदा जर्मनीच्या चँसेलरपदी निवड झालीय. जर्मनीत काल झालेल्या मतदानात मर्केल यांच्या पक्षाला ३३ टक्के मतं मिळाली.

मर्केल यांचे सर्वात निकटव्रर्तीय प्रतिस्पर्धी सोशालीस्ट डेमोक्रॅटिक पक्षाचे मार्टिन शूल्ट्ज यांचीही लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं कालच्या निवडणूकीतून स्पष्ट झालंय.

दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच सोशालिस्ट डेमोक्रॅटिक पक्षाला २० ते २१ टक्के मतं मिळवण्यात यश आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *