बोरिवली नॅशनल पार्कमध्ये कान्हेरी लेण्यांच्या पायथ्याशी स्वस्तात, ताजी आणि विविध प्रकारच्या जीवनसत्वांसह भरभरून असलेली काही रानं फळ मिळतात, ती नक्की खा. कारण यात अनेक प्रकारचे जीवनसत्व लपलेली आहेत.
ही फळं खाल्ल्याने तुमच्या त्वचेला, केसांपासून आरोग्याला मोठे फायदे मिळणार आहेत, त्यातून तुमच्या शरीराला नैसर्गिक उर्जा मिळते, यातील स्टार फ्रूट तर अतिशय महत्वाचं आहे, यात विटामीन सी भरभरून आहे. यातील प्रत्येक ताज्या फळात काहीना काही सत्व लपलेली आहेत, तेव्हा नॅशनल पार्कला गेले तर या फळांचा आस्वाद जरूर घ्या.
