डेविड वॉर्नर प्रॅक्टीससाठी किट बॅग उघडायला गेला आणि…..

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेविड वॉर्नर  हा नेहमीच परिवारासोबत घालवलेल्या आनंदी क्षणांचे फोटो सोशल मीडियात शेअर करत असतो. नुकताच वॉर्नरने एक फोटो शेअर केलाय, ज्यात त्याची मुलगी त्याच्या किट बॅगमध्ये झोपलेली दिसते आहे.

टीम ऑस्ट्रेलिया भारत विरूद्धचा दुसरा वनडे सामना खेळण्यासाठी कोलकातामध्ये दाखल झाली आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर कर्णधार वॉर्नरवर दबाव वाढला असणार आहे. पण वॉर्नर असा खेळाडू आहे ज्याच्या चेह-यावर दबाव कधीच दिसत नाही.

कोलकाता वनडेच्या प्रॅक्टीससाठी डेविड वॉर्नर हा जसाही आपल्याकडे किट बॅगकडे गेला तेव्हा त्याने असे काही पाहिले की, तो स्तब्ध झाला. त्याला त्याच्या बॅगमध्ये त्याची मुलगी झोपलेली दिसली. याचाच फोटो त्याने शेअर केलाय.

दरम्यान, ही पहिलीच वेळ आहे की, डेविड वॉर्नर हा टीम इंडिया विरूद्ध भारतात वनडे खेळत आहे. या दौ-यावर सराव सामन्यात वॉर्नरने चांगलीच झलक दाखवली होती. पण पहिल्या वनडे सामन्यात त्याचा खेळ चांगला झाला नाही. आता दुस-या सामन्यात तो काय करतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *