लंडनमधील मेट्रोमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात मेट्रोतील अनेक प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त कळतयं.
मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमधील भूमिगत मेट्रो स्थानकात अचानक एक स्फोट झाला. या स्फोटात मेट्रोतील काही प्रवासी भाजले आहेत. लंडनमधील पार्सन्स ग्रीन स्टेशनवर हा स्फोट झाला आहे.
हा स्फोट नेमका कशाचा होता याची माहिती अद्याप समजू शकलेली नाहीये. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. जखमींना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आपला तपास सुरु केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेट्रोमध्ये ठेवण्यात आलेल्या एका सफेद कंटेनममध्ये हा स्फोट झाला आहे. तसेच स्फोट झाल्यानंतर संपूर्ण मेट्रोमध्ये धुर निर्माण झाला होता. सध्या मेट्रो स्टेशनमधून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
