‘फुटबॉल महोत्सवा’चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुढील महिन्यात भारतात आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज एकाच दिवशी १० लाख विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.

या फुटबॉल महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. यावेळी क्रीडामंत्री विनोद तावडेही उपस्थित आहेत. मुंबई जिमखान्यात हा कार्यक्रम पार पडतोय.

यावेळी आठ वेगवेगळे सामने होणार आहेत. राज्यातील सर्वच शाळांमध्ये फुटबॉल खेळला जाणार असल्याने महाराष्ट्र फुटबॉलमय होणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम योजणारे महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *