राम रहीमचा निकटवर्तीय दिलावर अटकेत

राम रहीम आणि हनीप्रीत यांचा निकटवर्तीय असलेला दिलावर याला पोलिसांनी अटक केली आहे.

गेल्या २० दिवसांपासून पोलीस दिलावर याच्या शोधात होते. राम रहीमला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसाचारात दिलावर याने कट रचला होता.

याच दरम्यान आरोप आहे की, न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राम रहीमला न्यायालय परिसरातून पळवून रचण्यामागेही दिलावरचाच प्लॅन होता. मात्र, या आरोपासंदर्भात अद्याप पोलिसांनी कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये.

हरियाणाचे पोलीस महासंचालक बी एस संधू यांनी माहिती दिली की, दिलावर याला पानीपतमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला पंचकूला न्यायालयात हजर करण्यात आलं. सीबीआय न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरविल्यानंतर दिलावर भूमिगत झाला होता. दिलावर हा डेराचा प्रवक्ता होता.

 हनीप्रीतसंदर्भात मिळणार माहिती?

दिलावर हा हनीप्रीतचाही निकटवर्तीय होता. त्यामुळे दिलावर याच्याकडून हनीप्रीतसंदर्भात महत्वाची माहिती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राम रहीमला शिक्षा झाल्यानंतर हनीप्रीतही फरार झाली आहे. हनीप्रीत हिच्याविरुद्ध हरियाणा पोलिसांनी लुकआऊट नोटीस प्रसिद्ध केली आहे. अनेकदा बातम्याही समोर आल्या आहेत की, हनीप्रीत नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत आहे. मात्र, अद्याप हनीप्रीतसंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *