बेलापूर रेल्वे स्थानकाबाहेरच्या कचरापेटीत बेवारस मृतदेह!

बेलापूर रेल्वे स्थानकाबाहेरच्या कचरापेटीत बेवारस मृतदेह!

नवी मुंबईतील बेलापूर रेल्वे स्थानकाबाहेरील कचरा पेटीत पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महापालिकेची कचरावेचक गाडी सकाळी आली असता कचरा वेचणा-या कामगारांना अंदाजे ४५ वयाच्या इसमाचा हा मृतदेह सापडला आहे.

कचरापेटीत आढळलेल्या या मृतदेहाचे तुकडे केलेले आहेत. कचरापेटीत मृत व्यक्तीचे जळालेले मुंडके आणि एक हात सापडला. या मृतदेहाचा एक हात व धड अद्यापही पोलिसांना सापडले नाही. सदर मृतदेह साधारण ७ ते ८ दिवसांपूर्वी हत्या करुन मंगळवारी कचरा कुंडीत फेकला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *